तुझे गीत गाण्यासाठी.
हृदयाच्या गोष्टी कधी हळव्या, कधी निराळ्या, कधी उदास बनवणाऱ्या, तर कधी हुरहुर लावणाऱ्या…
ह्या विविधरंगी भावनांच्या रंगदर्शी, चित्रदर्शी रूपांचा आविष्कार पाडगावकरांच्या ह्या कवितासंग्रहात झाला आहे. ह्यातल्या बहुसंख्य कविता श्रीनिवास खळे, यशवंत देव ह्यांसारख्या दिग्गज संगीतकारांच्या संगीताचा साज लेऊन आणि लता, आशा, बाबूजी ह्यांसारख्या प्रतिभावंतांच्या सुरांच्या माध्यमातून गेली चार-पाच दशकं रसिकांच्या मनावर राज्य करत आहेत. हे शब्दरूपी भांडार पुस्तकरूपानं आपल्या संग्रहात असणं ही आपल्या रसिकपणाची ग्वाहीच ठरेल.
Reviews
There are no reviews yet.