In stock

किचन पोएम्स

किचन पोएम्स

100

SKU: 81-7486-584-5-1 Category:
Share
किचन पोएम्स.

स्वयंपाकघरातल्या कविता स्वयंपाकघर म्हणजे स्त्रीमनाचा हळवा कोपरा, तिच्या सुखदुःखाचं हक्काचं ठिकाण. त्याच्याशी तिचं जन्मभराचं नातं जडलेलं असतं. धीरुबेन पटेल ह्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिकेनं अलीकडेच इंग्रजीतून लिहिलेल्या ‘किचन पोएम्स’ ह्या आगळ्यावेगळ्या, स्त्रीजीवनाशी निगडित अशा कवितांचा उषा मेहता ह्यांनी केलेला हा सुंदर अनुवाद आहे. ह्या संग्रहातल्या कवितांना स्वयंपाकघराची पार्श्वभूमी आहे. स्वयंपाकघरात काम करताना काहींना कंटाळा येतो, तर काहींना आत्यंतिक आनंद होतो. त्यामुळं ह्या कवितांतून स्त्रीच्या बाह्यरंगाबरोबरच अंतरंगातल्या जाणीवाही आरेखित झाल्या आहेत, पण तरीही ह्या रूढार्थानं स्त्रीवादी कविता नाहीत. आत्तापर्यंत अनेक कवितांतून स्वयंपाकघर डोकावून गेलं असलं तरी ह्या संग्रहात स्वयंपाकघरातून काव्य डोकावताना दिसतं.
एक वेगळा काव्यानंद घेण्यासाठी हा काव्यसंग्रह अवश्य संग्रही ठेवायला हवा.