Out of stock

यात्रिक

यात्रिक

70

Out of stock

SKU: 81-7486-311-7-1 Category:
Share
यात्रिक.

‘यात्रिक’ची ही दुसरी आवृत्ती. पहिली आवृत्ती सव्वीस वर्षांपूर्वी प्रसिद्ध झाली होती. ह्या मध्यंतरीच्या कालखंडाला मराठी काव्यातील साठोत्तरीचा कालखंड म्हणतात. ह्या काळात वैशिष्ट्यपूर्ण अशी काव्यरचना झाली. तदनुसार एकूण काव्यविषयक जाणिवतेही भर पडली असे मानले, तर प्रस्तुत कवितेकडे आता त्या दृष्टीतून पाहिले जाईल असे म्हटले पाहिजे. ही कविता बऱ्याच काळापासून लोकांसमोर नव्हती. म्हणून सामान्यपणे ती अपरिचित राहिलेली आहे. चालू कवितेचा ऐतिहासिक आढावा घेताना प्रस्तुत कवीच्या कवितेचा उल्लेख होतो. अशा वेळी स्थूलमानाने काही ठराविक वैशिष्ट्ये सांगण्याचा प्रघात आहे. ह्या आवृत्तीमुळे हा अपरिचय दूर होण्यास मदत होईल व त्याच्या एकूणच काव्याबद्दल अधिक सार्थपणे बोलणे शक्य होईल अशी खात्री वाटते. कविता जिवंत असेल तरच महत्त्वाची. परंतु, अगोदर ती समग्रतेने समजून घेतली पाहिजे. कवीच्या दृष्टिकोणानुसार काही ओळींचा उल्लेख करणे म्हणजे काव्यचर्चा करणे नव्हे. कवितेत वैचारिकेचा घटक असतो ही गोष्ट निश्चित. परंतु मुळात वैचारिका ही स्वतंत्र व सत्यदर्शक अशी अमूर्त संकल्पनांची तर्कशुद्ध रचना असते. कवीचे मानुषदर्शन मात्र त्याच्या स्वत:च्या कमाईचे व जीवनाशी त्याच्या असलेल्या प्रत्यक्ष व जिवंत संपर्कामधून उदयाला आलेले असते. त्याच्या शोध घ्यायचा तर तो काव्यान्तर्गत अनुभवांमधून व त्यांच्या विवक्षित विविध व्यवस्थितींमधून घ्यावा लागतो. ‘यात्रिक’च्या संदर्भात सहज ओघाने सुचलेल्या विचाराचा येथे उल्लेख केला. त्याचा उलगडा करण्याचे हे स्थळ नव्हे. ‘यात्रिक’ची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केल्याबद्दल प्रा. श्री. पु. भागवत यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.