Out of stock

सहेला रे

सहेला रे

60

Out of stock

SKU: 81-7486-311-7 Category:
Share
सहेला रे.

वासंती मुझुमदार यांच्या या संग्रहात त्यांनी १९५७ ते १९८१ या काळात लिहिलेल्या कवितांपैकी निवडक कविता समाविष्ट केल्या आहेत. ‘रूप’ या चक्रमुद्रित लघुअनियतकालिकातून त्यांच्या प्रारंभीच्या अनेक कविता वाचकांसमोर आल्या आणि नंतर ‘सत्यकथा’, ‘दीपावली’, ‘मराठवाडा’, ‘अनुष्टुभ’, ‘मरवा’, ‘स्त्री’ इत्यादी नियतकालिकांनी त्यांच्या कविता प्रसिद्ध केल्या. कृष्णाकाठी बालपण घालविलेल्या वासंती मुझुमदारांना उपजतच रंग, रेषा, आकार आणि नाद व लय यांची तीव्र जाण लाभलेली आहे. मुख्यत: निसर्गप्रतिमांतून उत्कट भावानुभूती व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कवितेत ही जाण उमटलेली दिसेल. चित्रकला आणि संगीत हे त्यांचे स्वतंत्रपणे जोपासलेले आवडीचे विषय आहेत. पुण्यास महाविद्यालयीन शिक्षण घेऊन नंतर मुंबईस त्यांनी मराठी वाङ्मय आणि वाङ्मयसंशोधन यांमध्ये पदव्युत्तर अध्ययन यशस्वीपणे पूर्ण केले. त्यांच्या कवितेच्या छंदोबद्धतेतून आणि शब्दकळेतून वाङ्मयाचे, विशेषत: विदग्ध वाङ्मयाचे, त्यांच्यावरचे संस्कार जाणवले तरी ते यांत्रिकपणे आलेले नसून त्यांच्या स्वत:च्या भावविश्वाचा आणि नाद-लय-प्रेरणांचा स्वतंत्र ठसा घेऊन आलेले दिसतील.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सहेला रे”

Your email address will not be published. Required fields are marked *