१९९० ते १९९३ या काळात, तारा वनारसे यांनी लिहिलेल्या कवितांचा ‘बारा वाऱ्यांवर घर’ हा संग्रह. त्यांनीच अनुवादिलेल्या एमिली ब्रॉन्टे यांच्या सहा कविता मूळ इग्रंजी संहितेसह या संग्रहात समाविष्ट आहेत. त्या कविता अनुवादत असता, तारा वनारसे यांना या संग्रहातल्या स्वत:च्या कवितांचे रूप दिसत गेले. वाङ्मयाप्रमाणे, रंगभूमीची, भारतीय अभिजात संगीताची आणि चित्रकलेची जाण आणि ओढ असलेल्या तारा वनारसे आधुनिक वैद्यकशास्त्राच्या पदवीधर आहेत. भारतात आणि इग्लंडमध्ये त्यांनी वैद्यक-व्यवसाय केला आहे. दीर्घ काल त्यांचे वास्तव्य इग्लंडमध्ये आहे. त्यांच्या मराठी लेखनाच्या ऊर्मी तशाच टवटवीत आहेत. ‘पश्चिमकडा’ (कथा), ‘सूर’ (कादंबरी), ‘कक्षा’ (नाटक), ‘नर्सेस क्वार्टर्स’ (एकांकिका) अशा विविध वाङ्मयप्रकारांतल्या त्यांच्या पुस्तकांतून त्या वेधकपणे व्यक्त झाल्या आहेत. गद्य लेखनातून प्रतीत होत राहिलेली त्यांची संवेदनशीलता अधिक शुद्ध पारदर्शक रूपात इथे त्यांच्या उत्कट, नाट्यगर्भ कवितांतून भेटत राहील असा भरवसा वाटतो.
Out of stock
बारा वाऱयांवर घर
बारा वाऱयांवर घर
Reviews
There are no reviews yet.