‘आठवणीतल्या कविता’ या संकलनाचा हा चवथा आणि अखेरचा भाग. शाळेत शिकलेल्या कवितांबद्दलच्या मधुर हुरहुरीतून (नॉस्टाल्जिया) ‘आठवणीतल्या कविता’ या संकलनाची कल्पना जन्माला आली. दूर, सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या कुणा आजोबाला आपल्या नातवासाठी ‘पंडुं आजारी’ ही कविता हवीशी झाली आणि तिचा इथं शोध घेताना हे ‘मौजे’चं आजारपण इथंही पसरलं… सगळीकडे आठवणींचे पिंपळ शाळेतल्या कवितांनी सळसळले… त्या पिंपळांवर कवितांची शाळाच जमली… छंद म्हणून कुणी त्यांचं संकलन केलं. ‘ज्यांचं त्यांना अर्पण करावं’ या रसिकनिष्ठ भावनेतून कुणाला संग्रहाची कल्पना सुचली. हा सगळा व्यवहार हळुवार प्रेमाचा व्हावा यासाठी कुणी ‘आठवण’ या अव्यावसायिक प्रकाशन-संस्थेची कल्पना काढली… साराच वेड्यांचा बाजार! पण या वेडाला अकल्पनीय, अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अनेक रसिकांच्या दृष्टीनं हे संकलन आणि त्याचं ग्रंथरूपानं प्रकाशन ही एक मोठी सांस्कृतिक घटना (इव्हेंट) होऊन बसली. ‘आठवणीतल्या कविता’च्या या भागात लहान-मोठ्या एक्यायशी कविता असून काही कविता क्रमिक पुस्तकांतल्याच चित्रांसह छापल्या आहेत.
In stock
आठवणीतल्या कविता – भाग 4
आठवणीतल्या कविता – भाग 4
Reviews
There are no reviews yet.