वात्रटिका.
१९६० ते १९६२ या काळात मंगेश पाडगावकरांनी वात्रटिका लिहिल्या. वात्रट आणि टीका या दोन शब्दांचे ध्वनी एकत्र करून आधी ‘वात्रटिका’ हा शब्द तयार केला. कमी ओळींचा हा प्रकार आहे, हे सुचवण्यासाठी, या शब्दाचे ऱ्हस्वीकरण करून, अखेर ‘वात्रटिका’ हे नाव निश्चित केले. १९६३ साली श्री. रामदास भटकळ यांनी वात्रटिका हा संग्रह पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केला. पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर लिहिलेल्या या ७० वात्रटिका आहेत. ‘वात्रटिका’च्या पहिल्या आवृत्तीत ‘घास घे रे’ ही वात्रटिका सगळ्यांत शेवटी छापली होती. तोच अनुक्रम या दुसऱ्या आवृत्तीत आहे. ‘घास घे रे’ या वात्रटिकेनंतर येणाऱ्या वात्रटिका नव्या आहेत.
Reviews
There are no reviews yet.