‘पुष्पगंधा’ हा य. द. भावे यांचा चौथा कवितासंग्रह. ‘आर्द्रा’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह मराठीतील नवकवितेच्या बहराच्या काळात (१९४९) रसिकांसमोर आला. त्याच्या मागोमाग ‘हळवे भिंग’ (१९५१) आणि ‘मीलन’ (१९५५) हे प्रसिद्ध झाले. ‘मीलन’ नंतरच्या तीस वर्षांमधील कविता आता ‘पुष्पगंधा’ मध्ये एकत्र आल्या आहेत. यशवंत दत्तात्रय भावे यांचा जन्म पुणे २६ जुलै १९११ साली झाला. पुणे येथेच महाविद्यालयीन व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर चिपळूण, पुणे, मुंबई, राजकोट, बेळगाव इत्यादी ठिकाणी महाविद्यालयांमध्ये त्यांनी सुमारे चाळीस वर्षे इग्रंजी साहित्याचे अध्यापन केले. काही वर्षे त्यांनी प्राचार्यपदही सांभाळले. कवितेखेरीज कथा, ललितनिबंध या वाङ्मयप्रकारांतील त्यांचे लेखन ‘यशवंत’, ‘मनोहर’, ‘सह्याद्री’, ‘वसंत’, ‘साहित्य’, इत्यादी नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. १९५१ साली पंढरपूर जिल्हा कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
In stock
पुष्पगंधा
पुष्पगंधा
Reviews
There are no reviews yet.