In stock

तळपाणी

तळपाणी.

80

SKU: 81-7486-151-3 Category:
Share
तळपाणी .

कवी उत्तम कोळगावकर यांच्या ‘जंगलझडी’ या पहिल्या कवितासंग्रहात मानवी जीवनातील नैसर्गिकतेचा होत असलेला विनाश ग्रामीण निसर्गप्रतिमांच्या आणि प्रतीकांच्या माध्यमातून सर्वस्वी निराळ्या रीतीने आविष्कृत झाला आहे. ‘तळपाणी’ या नव्या कवितासंग्रहातील कवितांतून कोळगावकर अधिक समर्थपणे विविध जीवनानुभवांचा वेध घेत आहेत. इथे त्यांचे अनुभवक्षेत्र विस्तारत जाताना दिसत आहे. अनुभूतीचा एखादाही हिंदोळ अलगद टिपण्यापासून वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांतील अनुभवांनासुद्धा कोळगावकरांनी आपल्या सहज शैलीत फुलवले आहे. समाजमूल्यांचा आणि भावविश्वाचा कोसळ अनुभवताना आकान्त करणारे कविमन नैराश्याच्या तमात हरवून जात नाही तर ते दुसऱ्याच क्षणी ‘चिमुकल्या छाव्यांचे’ आणि ‘नव्या नव्या राव्यांचे’ स्वागत करण्यासाठी तयार होते. राखेच्या ढिगात काही शोधत बसण्यात काही अर्थ नाही हे सत्य त्याला उमगते; म्हणूनच या कविमनाला गर्जत येणाऱ्या पाऊसवाऱ्यांची चाहूल लागते आणि ते पेरणीसाठी सज्ज होते. नैराश्याच्या वाटा अखेर सृजनाचा ओघ कुंठित करतात याची जाणीव या कविमनाला आहे म्हणूनच ते डोंगरकपारी धुंडाळत दिशाहीन भटकंती करणाऱ्याला शेताकडे परत फिरण्याचा सल्ला देऊन ‘पडीक शेताच्या पोटातलं पाणी’ अर्थात ‘तळपाणी’ त्याला हाका मारीत आहे या वस्तुस्थितीची जाणीव करून देते.