In stock

उदासबोध

उदासबोध

200

SKU: 978-81-7486-899-2 Category:
Share
उदासबोध.

नव्या जाणिवांसाठीचा
आपल्या समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार,अत्याचार,फसवणूक,गुंडशाही,झुंडशाही,ढासळलेली नीतिमत्ता, सत्याची होणारी पायमल्ली आणि ह्या सगळ्याचा कळस म्हणजे हे सगळं पाहूनही तोंडातून ब्र न काढता बळीचा बकरा व्हायला तयार असणारी जनता पाहून, आज रामदास असते तर निश्चितच त्यांनी ‘दासबोधा’ ऐवजी ‘उदासबोध’ लिहिला असता. हा कवितासंग्रह वाचून जनतेनं निर्भय होऊन हे सर्व सहन न करण्याचा निर्धार करावा, ह्या नव्या जाणिवेमध्येच उदासबोधाची इतिकर्तव्यता आहे. ह्यातली प्रत्येक कविता म्हणजे वाचकाच्या मनातल्या भावनाच पाडगावकरांनी त्यांच्या शब्दात उतरवलेल्या आहेत. ह्यातली सरळ, साधी, सोपी, पण मिस्कील भाषाशैली वाचकांना निश्चितच आकर्षित करणारी आहे.