सलाम.
‘सलाम’ या कवितासंग्रहात सामाजिक-राजकीय जाणिवेच्या कविता मी एकत्रित केल्या आहेत. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या किंवा इझमच्या झेंड्याखाली पूर्वी कधीही उभा नव्हतो आणि आजही उभा नाही. माझ्या या मुक्त वृत्तीचा मला अभिमान आहे. कलावंत हा पक्ष, पंथ, इझम यांच्या पल्याड उभा असला पाहिजे असे मी मानतो. त्याची बांधिलकी जीवनाच्या प्रामाणिक अनुभूतीला हवी. खरा कवी हा कुठल्याही विचाराचा प्रचारक नसतो. आपली जीवनदृष्टी तो वाचकाच्या गळी उतरवण्याचा कधीही प्रयत्न करीत नाही. असा कवी वाचकाचे विचारस्वातंत्र्य, अनुभूतिस्वातंत्र्य आदरपूर्वक गृहीत धरून चालतो. तो नम्रपणे इतकेच म्हणतो, “माझा जीवनविषयक अनुभव हा असा आहे; जीवनाकडे पाहण्याची हीसुद्धा एक शक्यता आहे.”
Reviews
There are no reviews yet.