प्रेमाचा शब्द
गोविंद कुलकर्णी यांच्या कवितांचा पोत एकदम वेगळा वाटतो. मनाला जाणवून जातो. साधी आणि गहन, लहान पण मोठी, मनाला जाऊन पोचणारी अशी ही कविता. प्रत्येक कविता वाचल्यावर गुंतवून ठेवते. एक नवा प्रत्यय अस्पष्टसा पण कुठेतरी जाणवून जाणारा प्रत्येक कवितेतून मिळतो. आपल्या चोख, स्वतंत्र मार्गाने जाणारा हा कवी प्रत्येक कवितासंग्रहाबरोबर मोठा होत गेला आहे. मराठीतील एक महत्त्वाचा कवी म्हणून मराठी साहित्यातले त्याचे स्थान अनन्यसाधारण आहे.
Reviews
There are no reviews yet.