प्राचीन गीतमंजूषा
ज्ञानेश्वरपूर्वकालीन गोरक्षनाथांपासून पठ्ठे बापूरावांपर्यंतच्या एकशे सत्तर कवींची एकूण ४३७ गीतं ह्या संग्रहात डॉ. ना. ग. जोशी ह्यांनी संकलित-संपादित करून समाविष्ट केली आहेत. प्रत्येक कवीचं आणि बहुतेक सर्व गीतांचं वैशिष्ट्य सांगणाऱ्या टीपा,सूची इत्यादींचाही समावेश त्यांनी ह्यात केला आहे. वारकरी, नाथ, रामदासी इत्यादी पंथांतल्या कवींची आणि शाहिरांची गीतं ह्यात आहेतच, शिवाय महानुभाव, जैन, लिंगायत, गुजराती, मुसलमान, ख्रिस्ती आणि काही अनाम कवींच्याही गीतांना प्रथमच इतक्या मोठ्या संख्येनं एकाच पुस्तकात स्थान मिळालं आहे.
Reviews
There are no reviews yet.