प्लीज
गेली चारपाच वर्षं माझा नवा कवितासंग्रह प्रकाशित व्हावा म्हणून श्री. पु. भागवत सतत माझा पाठपुरावा करत होते. प्रकाशक म्हणून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारूनही माझा संग्रह त्यांना ‘याचि डोळां’ पाहायचा होता. माझ्याकडूनच चालढकल होत होती… -आणि अखेर श्रीपु गेले! एक कायम छळणारं अपराधीपण मनात वागवतच मी त्यांच्या निश्चेष्ट पायांना स्पर्श केला! आज प्लीऽऽज ! या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने त्या ‘छळणाऱ्या अपराधीपणा’चं प्रायाश्चित घेत आहे! श्रीपुंचे माझ्या वाट्याला आलेले व्यक्तिविशेष ‘मौज’, दिवाळी २००७ या अकांतील लेखातून मी व्यक्त केले होते. त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ते इथे पुनर्प्रकाशित करत आहे.
Reviews
There are no reviews yet.