मनाचिये गुंफी
आपल्या ‘मनाचिये गुंफी’ मध्ये काय चाललेलं आहे हे बरेचदा समजतच नाही, त्यामुळे येणारी अस्वस्थता, व्याकुळता, कशाची तरी अनामिक ओढ हे सार कां व कोठून सुरू यावर नेमकं बोटही ठेवता येत नाही. या साऱ्या गूढ, तरल भावना नेणिवेतून झिरपत जाणिवेत येतात व नंतर अविष्कारित होतात. हळुवार व तरल भावनांना शब्दांचे जड ओझे न्याय देऊ शकत नाही, परंतु शेवट तेच माध्यम म्हणून वापरावे लागते. कवयित्रीने या माध्यमाचा वापर समर्थपणे केला आहे असे म्हणावेसे वाटते. कारण या कविता वाचताना आत्मप्रत्ययाच अनुभव निश्चितच येतो. हेच कवयित्रीचे यश आहे असे वाटते.
Reviews
There are no reviews yet.