“…तत्त्वज्ञ, कलावंत, मवाली इत्यादी मंडळी आवश्यकत: आत्यंतिक असतात. रिंबो नि डिलन थॉमसची उदाहरणे तर सुप्रसिद्ध आहेत. वेश्येला कान कापून देणारा व्हिन्सेट व्हॅन गॉफ काही वेगळा नाही. स्वत:च्या मनोविभ्रमांत वेडेपिसे होऊन जगणे आणि आत्यंतिक टोकाला जाणे हे कमीअधिक प्रमाणात सर्वच कलावंतांच्या बाबतीत घडते. अदृष्ट तरीही सत्य गोष्टींच्या भासाने ते लौकिक चौकटीच्या पार जाण्याची धडपड करीत असतात आणि इथेच त्यांच्या लौकिक अपयशाची आणि आध्यात्मिक आनंदाची सुरुवात होते. यातून जाताना अवघे आयुष्य होरपळ होऊन जाते. जीवनसत्य प्रस्थापित करण्याऐवजी भाववून घेण्याची ही धडपड कलावंताला दैवी असमाधान मिळवून देते. यातूनही ते जीवनसत्य शब्दांतून प्रकट करताना होणारा आटापिटा, त्यात वारंवार येणारे अपयश यांतून कलावंतांची घडण होत जाते. हे सगळे स्वीकारत गेले तरच कवी हा कवी होतो. यापासून पळ काढणारा नुसताच पद्यकार म्हणून उरतो. हे इमान कसोशीने सांभाळता आले पाहिजे. दिसामासाने ओटीपोटात वाढणारी आग आनंदाने जपली-जोपासली पाहिजे. मला हे कितपत जमले आहे याचे उत्तर माझ्यापाशी नाही…”
Out of stock
लालकोवळा काळोख
गुरुनाथ धुरी
Reviews
There are no reviews yet.