कबीर.
कबीरांच्या चरित्राविषयी कोणताही ऐतिहासिक पुरावा मिळत नाही. म्हणूनच सांगोवांगी कथा, दंतकथा ह्यांच्या आधारे पाडगावकरांनी कबीरांच्या काव्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते वास्तवाच्या पातळीवर दंतकथांना आधार नसला तरी त्यांतून समाजाचं मन व्यक्त होत असतं. कबीर हे निर्गुण संत आहेत. ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग ह्या दोन्हींचा मिलाफ त्यांच्या काव्यात आहे. कबीरांनी त्यांच्या काव्यातून सतत समाजप्रबोधन केलं आहे. अशा ह्या कबीरांच्या काव्याचा पाडगावकरांनी सुंदर सुबोध अनुवाद करून वाचकांनाही कबीर-काव्याची गोडी अनुभवण्याची सुसंधी दिली आहे.
Reviews
There are no reviews yet.