Gurucharitra
१गुरुनाथ सामंतांच्या कवितेत आत्मनिवेदन आहे, आत्मक्लेशही आहेत, पण आत्मनाश मात्र नाही. त्यांच्या कवितेतली व्यक्ती प्रसंगी आपल्या नाकर्तेपणावर चिडून आक्रस्ताळेपणा करते, भोवतालच्या कळपातल्या माद्यांवर आणि हिजड्यांवर उपहासाने थुंकते; पण स्वत:तल्या कुरूपतेलाही धैर्याने ती सामोरी जाते. स्वत:तले मनोगंड तसेच कामगंडही ती बेदरकारपणे उघड्यावर मांडते. त्यांच्या समग्र कवितेतच हे स्वत:ला प्रामाणिकपणे सामोरे जाणे आहे. प्रवृत्तीने पाहता गुरुनाथ सामंतांची कविता मर्ढेकरांपासून मराठी कवितेत सुरू झालेल्या नवतेची परंपरा जोपासणारी आहे. पण असे असूनही अभिव्यक्तीत ती सर्वस्वी त्यांची स्वत:ची, त्यांच्या अनुभूतीतूनच निर्माण झालेली आणि परंपरेत नवी भर घालण्याइतकी समर्थ आहे.
Reviews
There are no reviews yet.