तांबड्या समुद्राच्या किनाऱयावर
“अशी असेल आम्ही शोधत असलेली कविता : कष्टकऱ्यांच्या हातांनी जीर्णशीर्ण झालेली अॅसिडच्या माऱ्याने खडबडीत झालेली घामाने आणि धुराने चिकचिकलेली सनदशीर आणि बेसनदशीर अशा जगण्यासाठीच्या विविध उद्योगांनी पोसलेली, लघवीचा तीव्र वास आणि जाईचा सुगंध एकत्र आणणारी कविता आमच्या अगांतल्या घामेजल्या कपड्यांसारखी किंवा अगांसारखी कविता कालवणाच्या डागांनी आणि शरमेने मळलेली सुरकुत्या, स्वप्नं, निरीक्षणं, भाकितं घोषणापत्रं प्रेमाची आणि द्वेषाची रांगडी आणि क्रूर जाहिरनामे, शंका, नकार, स्वीकार आणि जाचक भार या सगळ्यांनी रापून ओसंडणारी कविता.”
Reviews
There are no reviews yet.