In stock

युगे आठ्ठावीस

युगे आठ्ठावीस

80

Category:
Share
युगे आठ्ठावीस

गोविंद कुलकर्णी यांची कविता म्हणजे सद्य:कालीन वैविध्यपूर्ण परिस्थितीचे सजग भान ठेवून केलेले चिंतन आहे. ते स्वतंत्र आणि प्रत्ययकारी विचारसरणी जोपासलेले कवी आहेत. कोणत्याही साहित्यप्रवाहाच्या बंधनात न अडकणारी, मोजकी पण आशयसंपन्न कविता लिहिणारे कवी म्हणून त्यांचे नाव मराठी काव्यरसिकांच्या हृदयावर खोलवर कोरले गेले आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ सातत्याने आणि चिंतनशील लेखन करणारा हा कवी आपल्या काव्याच्या वेगळ्या पोतामुळे व जाणिवांच्या सखोलतेमुळे एकदम वेगळा वाटतो. त्यांच्या कवितांवर कुणाचीही छाप नाही. जे आहे ते फक्त त्यांचे आहे व ते फार उत्कट, सच्चे, प्रामाणिक असे आहे. अत्यंत साध्या, अनलंकृत शब्दांतून आकाराला येणारी ही कविता मनाला थेट भिडते. माणसाविषयीचे प्रेम आणि साधेपणा ही या कवितेची खरी ओळख. मराठी कवितेत आज एक चलाख, स्मार्ट आणि गुंतागुंतीचा नुसताच आभास निर्माण करणाऱ्या अशा लेखनाचा पूर आला आहे. त्याच्या तुलनेत गोविंद कुलकर्णी यांच्या कवितेतला सहज प्रांजलपणा फार हृद्य वाटतो.