‘मोरू’ या कवितासंग्रहात एकूण ५५ कविता आहेत. त्यांतल्या ४२ कविता ‘लोकसत्ता’ दैनिकाच्या ‘लोकरंग’ या रविवारच्या पुरवणीत ६ जुलै १९९७ ते १५ फेब्रुवारी १९९८ या काळात प्रसिद्ध झाल्या. ‘लोकसत्ता’चे संपादक श्री. अरुण टिकेकर, त्यांचे सहकारी श्री. दत्ता पंचवाघ आणि या कवितांना चित्रांकित करणारे व्यंगचित्रकार श्री. विकास सबनीस यांचा मी आभारी आहे. सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातील ‘सामान्य माणसा’ला ‘मोरू’ हा कवितासंग्रह अर्पण करण्याची माझी इच्छा होती. श्री. आर. के. लक्ष्मण यांनी या गोष्टीला संमती दिली, आणि अर्पणपत्रिकेसाठी या सामान्य माणसाचे व्यंगचित्र रेखाटून दिले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे श्री. अशोक जैन यांनी श्री. आर. के लक्ष्मण यांच्याशी माझी भेट घडवली आणि त्यांनी रेखाटलेले चित्र माझ्यापर्यंत पोचवले. श्री. अशोक जैन यांचा मी आभारी आहे. ‘सलाम’, ‘उदासबोध’, ‘निंबोणीच्या झाडामागे’, ‘वात्रटिका’ या माझ्या पुस्तकांची मुखपृष्ठे आणि आतली काही चित्रे सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री. वसंत सरवटे यांची आहेत. ‘मोरु’चे मुखपृष्ठ व आतील रेखाचित्रेही त्यांचीच आहेत. श्री. वसंत सरवटे यांचा मी आभारी आहे. आणि शेवटी आभार प्रा. श्री. पु. भागवत यांचे. ‘मोरू’ या कवितांची कल्पना सुचली तेव्हा या संकल्पनेची चर्चा मी भागवतांशी केली. त्यांच्याशी चर्चा करताना या लेखनाच्या अनेक शक्यता मला जाणवल्या. त्यानंतर यांतली प्रत्येक कविता वाचून त्यांनी माझ्याशी चर्चा केली. श्री. पु. भागवतांचा आधार होता म्हणून मी हे लेखन उत्साहाने करू शकलो.
Out of stock
मोरू
मोरू
Reviews
There are no reviews yet.