In stock

स्वप्नसंहिता

स्वप्नसंहिता

180

SKU: 978-81-7486-887-9 Category:
Share
स्वप्नसंहिता.

‘यशवंत मनोहर हे एक माणूस आहेत आणि या माणसातच एक कवीही आहे. म्हणजे एक मी आहे व ‘मी’मधील एक कवी आहे, हे ठीकच. पण यशवंत मनोहरांच्या कवितांमधून मी-माझे यासंबंधी जे जे जसे जसे प्रकट होते, ते ते वाचले व जाणून घेतले की एक गोष्ट लक्षात येते, ती अशी: या व्यक्तीमधील जो कवी आहे, त्याचेही एक जगणे आहे, सोसणे आहे; केवळ कविता करणे हेच तिचे सर्वस्वी जगणे नाही. आणि मनोहर ही व्यक्ती जे काही जगते व सोसते, ते ते प्राधान्याने तिच्यातील कवीचेच आहे. कवी हेच मनोहरांचे व्यक्तिरूप व कविरूपही! त्यांना जणू कविनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वच नाही. माणूस व कवी हे द्वैत अबाधित आहेच; पण माणूस म्हणून यशवंत मनोहर जे जे जगतात, जे जे सोसतात, ते ते माणसाचे नसून कवीचे असते. एलियटचा माणूस जगतो व सोसतो आणि कवी काव्य रचतो. उलट, मनोहरांचा माणूस काव्य करतो आणि कवी जगतो, सोसतो. …मनोहरांजवळ एक अभिजात शब्दकळा आहे, व्याकरणीय पाटव आहे, विधाने करण्याची हातोटी आहे, प्रश्न व प्रतिप्रश्न करण्याची वावदूक कुशलता आहे, एक प्रभावी वक्तृत्व आहे. आणि एक प्रदीप्त अतंराग्नीही आहे. एवढी साधनसामग्री जवळ बाळगणारा पुन्हा तरल संवेदनशीलता, अपूर्व कल्पनाशक्ती आणि उसळता विवेक यांही गुणांचा धनी असेल, तर तो झपाटून जाणार नाही तर काय करणार? …प्रत्येक कवी व प्रत्येक कविता आपल्यावर एक ऋण करून ठेवतात असे मी मानतो. स्वप्नसंहितेने केलेले ऋण चिमूटभर फेडण्याचा व बव्हंशी त्या ऋणातच राहण्याचा हा प्रयत्न आहे.’

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वप्नसंहिता”

Your email address will not be published. Required fields are marked *